मुख्य संपादक - मनोज पाटील (दिंडोरी)
सुरगाणा तालुक्यातील बार्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांची दिंडोरी पोलिस ठाण्यात बदली झाली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे यांनी सन - 2022 मध्ये नवी मुंबई वरून नाशिक ग्रामीण पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली. मे 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत इगतपुरी पोलीस स्टेशन इगतपुरी येथे कार्यरत असताना कुप्रसिद्ध डेव्हिड गँग यांच्या अनेक सदस्यांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.नंतर जानेवारी 2024 ते दि. 18 जून 2025 रोजी पर्यंत प्रभारी अधिकारी म्हणून बार्हे पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सन 2024 मध्ये लहान मुली पळून जाण्याच्या प्रकारात एकूण 12 केस दाखल करून तसेच बार्हेे पोलीस ठाणे हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आश्रमशाळा , महाविद्यालये व गावा - गावात जाऊन अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रबोधन करून लहान मुली पळून जाण्याच्या प्रकाराला आळा घातला. मांडवे येथील आरोपी वसंत जाधव याचे घरी छापा मारून त्याने त्याचे शेतात गांजा लावून त्याची कापणी करून घरात सुकत ठेवलेला सुमारे 09 किलो गांजा पकडण्यात आला. तसेच बर्डा येथील खुनाच्या प्रकरणात चोवीस तासाच्या आत आरोपींचा छडा लावून एकूण 12 आरोपींना अटक केली. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत सपोनि. राखोंडे यांनी गुन्हेगारांना वठणीवर आणून लहान मोठ्या चोर्यांचे प्रमाण कमी केले. आता त्यांची दिंडोरी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने दिंडोरी तालुक्यात वाढत्या गुन्हेगार्यांना आळा बसणार आहे. विद्यार्थींनींची सुरक्षितता, रोड रोमीओचा बंदोबस्त, अवैध व्यवसाय ,गुंडगीरी करणार्या विघातक अपप्रवृत्ती यांचेवर कारवाई तसेच तोतयागीरी करणारांवर व त्यांना संरक्षण देणारांना चाप याबरोबर सुरळीत वाहतुक व्यवस्था, शहरवासीयांबरोबर सकारात्मक हितगुज व्यापारी व व्यावसायिक यांच्या अडचणी प्रशासकीय आधिकारी व कर्मचारी यांना त्रस्त करणारे सवयीचे घटक या सर्व बाबींचा सखोल अभ्यास असल्याने गुन्हेगारांवर चाप बसणार आहे.