maharashtratribalnews

ठाणगावात जागतिक योग दिन साजरा

बा-हे l नामदेव पाडवी 
सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा ठाणगाव यांच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. 
 यात पद्मासन, वज्रासन, सिद्धासन, मत्स्यासन, वक्रासन, गोमुखासन असे विविध प्रकारचे योगासने घेण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक पांडुरंग वाघमारे, जेष्ठ शिक्षक पुना चौधरी, सुरेश चौधरी, बाबुराव वाघमारे, जयंतीलाल भोये, अंगणवाडी सेविका संगिता महाले, ग्रामपंचायत कर्मचारी शैलैश महाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांच्यासह गावातील तरुण आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने