maharashtratribalnews

हिंदी सक्तीविरोधात मनसेचे शाळांना पत्र

दिंडोरी । प्रतिनिधी:- दिंडोरी शहर व तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिंडोरी येथील शाळांंना हिंदी सक्ती नको याबाबत पत्र देण्यात आले आहे. 
    महाराष्ट्र नवनिर्माणचे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे मनसैनिकांनी हिंदीकरणाला विरोेध केला. दिंडोरी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल, अभिनव स्कुल, जनता इंग्लिश स्कुल, गोल्डन डेज युनिवर्सल स्कुल, गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल, बालभारती पब्लिक स्कुल येथे जाऊन तेथील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका यांना पत्र देण्यात आले आहे. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसर्‍या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार सुरू झालेत ही सर्व माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे तालुकाध्यक्ष अमोल उगले, जिल्हा उपाध्यक्ष मनोज ढिकले, जनहित कक्ष तालुकाध्यक्ष प्रफुल कलवले, शाखा प्रमुख दीपक भगत, केदु गांगोडे, रवी रणशिंगे, सुनील आहेर आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने