देवडोंगरी शंकर निंबारे :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शाळा मुरंबी येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सकाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहुउद्देशीय सभागृहात विविध प्रकारच्या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रिमती शितल खंडे हिने भुषविले होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती खंडे हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाहू महाराज यांच्या जिवनावर आधारित चित्रपट फिल्म दाखविण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक श्रीराज अथिलकर, दशरथ वडाळ, प्रदीप शिंदे, संजय भोये, डोंगरे तसेच पदवीधर शिक्षक श्री दौलत लहारे आणि प्राथमिक शिक्षक सुहास अस्वले, कृष्णा बाजकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनी कु सारीका लहारे व हर्षदा कोगिंल या विद्यार्थ्यांनी केले. तसेच बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.