दिंडोरी । मनोज पाटील:- भाजप हा सध्या जगातील एक क्रमांकाचा पक्ष बनला आहे. दिंडोरी तालुक्यातील अनेक नेते भाजपात येण्याची शक्यता आहे. आपले दिंडोरी तालुक्यात संघटन मजबुत असून पुढील काळात आपल्याला चांगले यश मिळणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव यांनी केले.
दिंडोरी येथे भाजपची बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी प्रा. बच्छाव बोलत होते. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव तसेच नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांचा दिंडोरी, ननाशी, वणी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सुनील बच्छाव यांनी सत्काराला उत्तरे दिले. सुनील केदार यांनी भाजप पक्षाची दिंडोरी तालुक्यातील वाटचाल विशद केली. यावेळी कार्यकर्त्यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार केली. ग्रामविकास व नगरविकास निधी देण्याबाबत वरिष्ठांकडे माहिती देणार असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, शिवाजी पिंगळ, विलास देशमुख, मनीषा बोडके, वसंत कावळे, शिवानंद संधान, आप्पा कुलकर्णी, लक्ष्मण गायकवाड, मदन लोखंडे, तुषार वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शामराव मुरकूटे, योगेश मातेरे, वसंत कावळे यांच्यासह प्रत्येक मंडळाच्या वतीने प्रा. बच्छाव व केदार यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत भाजप शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे यांनी केले. सुत्रसंचालन विधानसभा संयोजक रणजित देशमुख यांनी केले तर आभार चंद्रकांत राजे यांनी मानले. बैठकीस ज्येष्ठ नेते प्रमोद देशमुख, शामभाऊ बोडके ,संंपत पिंगळ, विजय पिंगळ, भास्कर गवळी, रमेश क्षिरसागर, नीलेश गायकवाड, मित्रानंद जाधव, कैलास धात्रक, शांताराम जाधव, गोविंद बोडके, ज्योती देशमुख, मंगला शिंदे, शरद मालसाने, प्रभाकर धात्रक, सोमनाथ निंबेकर, राम कराटे, राहुल केदार, संजय बोडके, डॉ. वराडे, किरण तिवारी आदी उपस्थित होते.