सुरगाणा l कृष्णा पवार:- आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा बाह्यश्रोत भरती प्रक्रिया / खासगीकरण रद्द करावे, रोजनदारी कर्मचारी वर्ग तीन व वर्ग चार यांना शासन सेवेत कायम करावे, अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, वंचित असलेल्या लोकांना ड घरकुल मिळावे, आदिवासी विध्यार्थीना करिता पांगारणे, उंबठाण येथे वसतिगृह उभारावे,तसेच पांगारणे येथील आरोग्य केंद्र विभाग नवीन इमारत बांधकाम करण्यात यावे, पिपंळसोंड,उबपाडा येथील जि. प. शाळा चे बांधकाम करावे.
सुरगाणा तालुक्यातील, ग्रामपंचायत गोंदूने मधील जुने विदयुत पोल बदलून नवीन पोल द्या, सर्वाना स्वस्त धान्य योजनेचा लाभ द्या, आदी विविध मागण्यासाठी भारतीय आदिवासी पँथर संघटना, आदिवासी बचाव अभियान, आदिवासी संघटना यांच्या वतीने राज्य महामार्ग बोरगाव -सुरगाणा -बर्डीपाडा क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा चौक पांगारणे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्राध्यापक युवा नेते प्राध्यापक तुळशीराम चिमण खोटरे यांनी सांगितले.