maharashtratribalnews

दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक ठार, एक जखमी

वणी l प्रतिनिधी :- वणी सापुतारा महामार्गावर खोरी फाट्यानजीक दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक इसम ठार झाला असून एका जखमीवर औषधोपचार सुरू आहे.
            याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वणी सापुतारा रस्त्यावर खोरीफाटा शिवारात सराड गावाकडून वणी बाजूकडे येणारी ( दुचाकी क्रं. एम. एच.१५/ई.व्ही.९०१३) व वणी बाजूकडून सापुतारा बाजूकडे येणारी ( दुचाकी क्रं. एम.एच.४७/बि.जि.२२५३) यांच्यात झालेल्या या धडकेत ( एम. एच.१५/ई.व्ही.९०१३) या दुचाकीवरील भागवत रामा भोये वय ४७ रा. सराड, ता.सुरगाणा,जि.नाशिक यांच्या डोक्यास व पायास मार लागून त्यात ते मयत झाले तर अशोक प्रकाश पाडवी वय ३३ रा. घागबारी, ता.सुरगाणा जि. नाशिक हे जखमी झाले. याबाबत वणी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास स.पो.नि. गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. गायकवाड करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने