maharashtratribalnews

अतिवेगामुळे दुर्घटना : अनियंत्रित कार बंगल्याला धडकली, मृत व जखमी नामपूर व देवळ्यातील कळवणमध्ये अपघातात मायलेक, नातीसह पाच ठार

कळवण l प्रतिनिधी :- नाशिकहून दवाखान्यातून परतताना तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे बुधवारी (दि.५) रात्री उशिरा कार बंगल्याला धडकून झालेल्या अपघातात आईसह विवाहित मुलगी व नातीसह पाच जण जागीच ठार झाले. दोघा गंभीर जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. मृत व जखमी नामपूर व देवळा येथील आहेत.
  अपघातात शैला वसंत भदाण (६२), मुलगी माधवी मेतकर (३२), त्रिष्णा मेतकर (४) यांच्यासह प्रतीक्षा भालचंद्र भदाण, चालक खालिद पठाण जागीच ठार झाले. भालचंद्र भदाण व उत्कर्ष मेतकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
 नाशिकहून सटाण्याकडे जात असलेली ग्रैंड आय १० कार भरधाव वेगाने जाऊन कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडकली. कारचा वेग प्रचंड होता आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार थेट विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या संरक्षक बीमवर आदळली. या भीषण धडकेत गाडीचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर कळवण, मानूर, व कोल्हापूर फाटा परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि काही क्षणातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात मृत माधवी मेतकर या देवळा येथील चष्मा दुकान असलेले योगेश मेतकर यांच्या पत्नी आहेत.

अपघातामध्ये कारचा झालेला चक्काचूर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने