बाऱ्हे l नामदेव पाडवी:- नाशिक येथील श्रद्धान केअर फाऊंडेशनच्या वतीने सुरगाणा तालुक्यातील आतीदुर्गम अशा ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
आदिवासी भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, चांगले गुण मिळवून त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने नाशिक येथील श्रद्धान फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अध्यक्षा किरणताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
ठाणगाव येथील विद्यालयात झालेल्या पुस्तक वितरण कार्यक्रमात फाऊंडेशनचे सदस्य गणेश जाधव, मयूर हिंडे, बेंडकुळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक निकम, ज्येष्ठ शिक्षक वामन महाले, आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला तसेच फाऊंडेशनने विद्यार्थ्यांप्रती जी सहानुभूती दाखवली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज वैद्य यांनी केले तर कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक संतोष नहीरे, मार्तंड अहीरे, दिलीप महाले, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.