बोरगाव l प्रतिनिधी:- अमास सेवा ग्रुप मुंबई यांचे माध्यमातून रोटरी हिल्स ठाणे या सेवाभावी संस्थेतर्फे सन 2025/26 या शैक्षणिक वर्षासाठी सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे, मालगव्हाण व मोहपाडा या तीन केंद्रातील 53 जि प प्राथमिक शाळांमधील 2078 विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
💥आज दि. 20/07/2025 रोजी सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे केंद्रातील 27 शाळेतील 773 शालेय विध्यार्थी यांना अमास सेवा ग्रुप मुंबई यांच्या माध्यमातून रोटरी हिल्स ठाणे या सेवाभावी संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी रोटरी हिल्सचे अध्यक्ष मा. श्री समीर लिमये होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.निलेश पितले (सचिव ) व सर्व सन्माननीय सदस्य तसेच अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष मा.चंद्रकांत भाई देढीया,गावचे सरपंच,उपसरपंच सर्व शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी पालक वर्ग बहू संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांचे आगमन झाल्यावर आदिवासी कला पथक व सांबळाच्या तालावर वाजत गाजत स्वागत रॅली काढण्यात आली.
💥होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य पुरवून विद्यार्थी गुणवत्ता वाढावी उपस्थिती टिकावी याकरिता रोटरी हिल्सने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अध्यक्ष श्री. समीर लिमये यांनी तुम्ही मुले 'उद्याचे भविष्य आहात'! चांगले शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहचून तुम्ही देशाची सेवा करावी अशी आशा व्यक्त केली.
💥हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख श्री एल के बागुल, मुख्याध्यापक श्री जयराम धूम श्री.विजय भोये सर,श्री.शंकर भोये सर, आर टी भोये सर,. के जी महाले सर.यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे कार्यक्रम उत्कृष्ट पार पडला.
💥या कार्यक्रमासाठी टीम नाशिकचे बहिरम सर व कोकणी सर तसेच डोल्हारे चे सर्व शिक्षक,समस्त गावकरी,केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभल्याने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. सर्वांचे पुनश्च मनःपूर्वक आभार!!जय हो दादा की!!