महाराष्ट्र ट्रायबल न्युज

पळसन येथे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिकच्या अधीक्षक कृषी अधिकारी संभाजीराव ठाकुर यांची भेट

सुरगाणा l कृष्णा पवार:- पळसन येथे मा. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नाशिक येथील अधीक्षक कृषी अधिकारी मा. संभाजीराव ठाकुर साहेब यांनी पिक प्रात्यक्षिक पाहणी केली. त्यांनी प्रगतीशील शेतकरी श्रीमती इंदुबाई गोपाळ गायकवाड व अन्य शेतकरी बांधवांशी संवाद साधत चार सूत्री भात लागवड, युरिया ब्रिकेटचा वापर, खत बचत, कीड व रोग व्यवस्थापन, योग्य वेळी कापणी व यांत्रिकीकरण यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
      या भेटीदरम्यान त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर तिखे, मंडल कृषी अधिकारी श्री. अनिल भोर, श्री. हंसराज भदाने, श्री. सुनील मोरे, उप कृषी अधिकारी श्री. विलास भोये, सहायक कृषी अधिकारी श्री. गुलाब भोये, श्री. रोहिदास देशमुख तसेच इतर सहायक कृषी अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने