महाराष्ट्र ट्रायबल न्युज

गडावर यात्रा मार्ग होणार हिरवागार 55 हजार वृक्ष लागवडीस सुरुवात

दिंडोरी - संपादक मनोज पाटील
सप्तशृंगगडाच्या दोन टेकड्या आता पुन्हा गर्द वनराईने बहरणार असून सुमारे 55 हेक्टर क्षेत्रावर 55 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प वन विभाग व जय हिंद लोक चळवळ यांनी सोडला आहे. सप्तशृंगगडाच्या पायी वाटेला येणार्‍या दोन वर्षात देवीच्या भाविकांना सावली मिळणार आहे. त्याचबरोबर फळांची चव सुध्दा चाखता येणार आहे. 
    सप्तशृंगगडावर मंकी पॉईट जवळ दोन ते तीन डोंगर ओसाड पडलेले होते. पर्यटक दरीचा आनंद घेण्यासाठी तिसर्‍या वळणाजवळ थांबतात. त्या ठिकाणी वन विभागाने बॅरकेटस केलेल्या आहे. दर्शनाला येता - जातांना एसएमबीटी हॉस्पिटलचे संचालक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना या ओसाड डोंगराचे आश्‍चर्य वाटायचे. हा डोंगर हिरवागार करण्याची संकल्पना त्यांनी डॉ. योगेश गोसावी, डॉ. शितलकुमार पहाडे, नगरसेवक नितीन गांगुर्डे यांंच्याशी अनेक वेळा बोलून दाखवली व त्याचे प्रत्यक्षात रुपांतर करण्याचे ठरविले. डॉ. सुधीर तांबे यांनी यासाठी वनविभागाकडे पाठपुरावा केला. सप्तशृंगगड ट्रस्ट, ग्रामपंचायत, वन विभाग यांच्याशी चर्चा केली. सुमारे 55 हेक्टर जागा कराराने जय हिंद लोक चळवळ व एसएमबीटी ट्रस्ट यांच्याशी वन विभागाचा करार करुन घेतली. त्यानुसार येथील पडीत जागेवर सलगचर खड्डे घेतले. याकामी डी. व्ही. वर्पे, जनार्दन मैद, वन परिक्षेत्र अधिकारी दिपावली गायकवाड, बाली मंजूळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. झाडांची लागवड करतांना भविष्यात पर्यटकांना फायदा व्हावा, तसेच गडावर असणारे वन्य प्राणी माकड, मोर यांनाही फायदा व्हावा, अशा पध्दतीने वृक्षांची निवड करण्यात आली. प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी साफसफाई करुन खंड्डे खोदण्यात आले. आता या 55 ंहजार वृक्ष लागवडीचा कामाचा शुभारंभ मुख्य वन संरक्षक मल्लीका अर्जून यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मल्लीका अर्जून यांनी पुर्ण भागाची पाहणी केली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनाही जंगल राखण्याचे सूचना केल्या. याप्रसंगी आयकर विभागाचे भरत आंधळे, डॉ. सुधीर तांबे, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापक उमेश वावरे, उप वनसंरक्षक राकेश शेपट, सहाय्यक वन रक्षक संतोष सोनवणे यांच्या हस्ते वृक्ष लागवड मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या वृंक्षाची लागवड केली जाणार असून त्याचे संगोपन सुध्दा केले जाणार आहे. यावेळी मुख्य वन संरक्षक मल्लीका अर्जून यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृक्ष लागवड करुन भागणार नाही तर वृंक्षाची जोपासणा करणे महत्त्वाचे आहे, असे मल्लीका अर्जून यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुधीर तांबे, संदीप बेनके, संजय ठोक, शशीकांत देसले यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन वन परिक्षेत्र अधिकारी दिपावली गायकवाड, बाली मंजूळकर, रामकृष्ण देवकर, प्रा. डी. व्ही. वर्पे यांनी केले. याप्रसंगी दिंडोरीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे, डॉ.शितलकुमार पहाडे, राजेंद्र गांगुर्डे, सचिन वडजे, प्रा. कोल्हे, नियाज शेख, विलास पेलमहाले, डॉ. योगेश गोसावी, रमेश पवार, सुनील खैरनार, राजेश गवळी, भाऊसाहेब बागूल, नाना राठोड, किशोर बोरा, किरण आहिरे, आदी उपस्थित होते. डी. व्ही. वर्पे, जनार्दन मैद यांनी आभार मानले.          
                                                                                                                                                                    
प्रतिक्रिया :- 
सप्तशृंगगड येथील रस्त्यावरील मंकी पॉईट येथे दोन पडीत डोंगर वनविभागाकडून वृक्ष लागवडीसाठी कराराने सात वर्षांसाठी घेण्यात आले असून या ठिकाणी सुमारे 55 हजार फळ झाडे लावण्यात येवून त्यांचे संगोपन करण्यात येणार आहे. सप्तशृंगी मातेची सेवा या निमित्ताने केली जाणार आहे. भाविकांना तसेच वन्य प्राण्यांना या वृक्ष लागवडीचा मोठा फायदा होणार आहे.
*डॉ. सुधीर ताांबे, संचालक - एसएमबीटी हॉस्पिटल*

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने