maharashtratribalnews

सुरगाणा तालुक्यातील जि.प.शाळा वरसवाडी येथे विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप

सुरगाणा l उमेश पालवा:-सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वरसवाडी ता. सुरगाणा येथे नाशिक जिल्ह्याचे कामगार आयुक्त श्री. चंद्रकांत बिरार साहेब व त्यांच्या पत्नी सारिका बिरार (पाटील) सहाय्यक कृषी अधिकारी , कृषी सहाय्यक राधा सहारे यांनी आदिवासी भागात जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांना एक छत्री , वही, पेन, व खाऊ म्हणून काजू, पिस्ता, बदाम, मनूके,बिस्किटे इत्यादी साहित्य वाटप केले.वस्तूंचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर आनंद फुलून आला.महोदयांचे शाळेविषयी प्रेम विद्यार्थ्या प्रती आस्था दिसून आली बालकांनी आवडीने हसत खेळत शिक्षण घेऊन पुढे चांगले जीवन सुखकर वाव्हे याकरिता विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक देविदास पालवी हे उपक्रमशील शिक्षक असल्याने ते नेहमीच वेगवेगळे उपक्रम शाळेत घेत असतात. मुख्याध्यापक पालवी व ग्रामस्थानी पाहुण्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
    प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक देविदास पालवी , शाळा व्यवस्थापक समितिचे अध्यक्ष त्र्यंबक गावित, समिती. तज्ञ. मार्गदर्शक अंबादास चौधरी. जेष्ठ नागरिक म्हणून चंद्रकांत चौधरी, सुरेश चौधरी व सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ थोरात (भदर). मुख्याध्यापक श्री. पवार सर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने