बोरगाव l लक्ष्मण बागुल :- सुरगाणा तालुक्यातील खडकी फाटा ते चिराई या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या दुतर्फा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (PWD) च्या वतीने सुमारे ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन व रस्त्यालगत हरित पट्टा तयार करण्याच्या उद्देशाने ही मोहिम राबविण्यात आली.
या वृक्षारोपणामुळे परिसरातील सौंदर्य वृद्धिंगत होणार असून, भविष्यात छायादार व प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व प्रशासनाने या उपक्रमाचे स्वागत केले असून, वृक्षसंवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.