maharashtratribalnews

उत्तमराव पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

दिंडोरी । मनोज पाटील:- निळवंडी येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जुने शिवसैनिक उत्तमराव पाटील यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे उमराळे बु. गट व मडकीजांब गणात राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहे. 
नाशिक महानगरपालिकेचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबतच निळवंडी येथील शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. म्हात्रे, सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ध्येयधोरणे ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उत्तमराव पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने