महाराष्ट्र ट्रायबल न्युज

चिराई घाटातील दिशादर्शक फलक चोरीला – परिसरात खळबळ

प्रतिनिधी | बोरगाव:- सुरगाणा तालुक्यातील चिराई घाट परिसरात लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
प्रशासनाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी मार्गदर्शनासाठी घाटात विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले होते. मात्र, अलीकडेच या फलकांपैकी एक मुख्य फलक अचानक गायब झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती ग्रामस्थांनी प्रशासन व पोलीस पाटील यांना दिली असून, संबंधित घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
   या प्रकरणी संबंधित विभागाने तातडीने नवीन फलक बसवण्याची मागणी होत आहे. तसेच, चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संपर्क साधला असता काही स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया दिली की, "या घाटात अनेक प्रवासी, पर्यटक व व्यापारी दररोज ये-जा करतात. दिशादर्शक फलक नसल्यास अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे हे फलक सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे."
स्थानिक प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित चोरट्यांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने