महाराष्ट्र ट्रायबल न्युज

स्वदेश फाऊंडेशन कडून विरमाळ येथील १३ लाभार्थ्यांना ४५० फळबाग रोपांचे वाटप

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- स्वदेस फाऊंडेशन, ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणारी एक ना-नफा संस्था आहे. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट, आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता, तसेच आर्थिक विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे उद्दिष्ट आहे. स्वदेश फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पेठ तालुक्यातील विरमाळ गावाचे सर्वेक्षण करून स्वप्नातील गाव बनविण्याचे ठरविले आणि ते आज सत्यात उतरले आहे. स्वदेश फाऊंडेशन कडून विरमाळ येथील १३ लाभार्थ्यांना आंबा,चिकू,लिंबू,नारळ असे एकूण ४५० फळबाग रोपांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक दिंगबर वाडेकर सार्थक गाव विकास समिती अध्यक्ष देविदास जाधव,खजिनदार राहूल धुम,लाभार्थी तसेच गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने