महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी अध्यापक विद्यालयात कारगिल विजय दिन संपन्न

दिंडोरी l वैभव पगार :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी येथील महाविद्यालयात शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवस एक्स नायब सुभेदार श्री. रविंद्र पवार साहेब व प्रमुख वक्ते मानद कॅप्टन मार्तंड दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ संजय काळोगे हे होते. सुभेदार रवींद्र पवार यांनी आर्मी,नेव्ही, एअर फोर्स दलाची कामगिरी, जबाबदारी व देश रक्षणातील वाटा या विषयी माहिती दिली. कारगिल युद्धातील प्रत्यक्ष सहभागी असलेले प्रमुख वक्ते कॅप्टन मार्तंड दाभाडे यांनी कारगिल घटना, भारतीय सैनिकांची कामगिरी, आर्मी सेवेतील भरती प्रक्रिया आर्मी मधील महिलांचे स्थान याविषयी माहिती देतांना भारतीय नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय काळोगे यांनी सैनिकांचे जीवन, देशाप्रती असलेली समर्पणाची भावना, याबद्दल मत व्यक्त करतानाच प्रत्येक नागरिकाने भारतीय सैनिकांची शिस्त, देशाप्रतीचे कर्तव्य, देश प्रगतीसाठी द्यावयाचे योगदान यावर प्रकाश टाकला. 
     सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ अनिल भोळे, उपप्रमुख प्रा श्रीमती स्मिता ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री धामणे मनोहर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.श्री शिंदे शिवाजी यांनी मानले, कार्यक्रमाचे यशस्वी साठी प्रा.श्रीमती महाले, श्री.ठोंबरे, श्रीमती जगताप, श्रीमती पाटील, श्री बाबा मोरे, श्री कराटे, वरखेडे,कदम,गावित,उखर्डे आदीं बरोबर छात्राध्यापक चौधरी लक्ष्मी,धुळे सविता, खैरनार गायत्री, खराटे रेणुका, धनश्री वाघ, पायल शार्दुल, योगिता वाघेरे, शितल गायकवाड यांचे सह छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने