महाराष्ट्र ट्रायबल न्युज

देविपाडा येथे भरपावसाते ताडपत्री चा आधार घेत करावा लागतो अंत्यविधी

प्रतिनिधी | बोरगाव
सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या गेल्या अनेक वर्षापासून जैसे थे आहेत. स्मशानभूमी शेड अभावी सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे. बुधवारी उंबरठाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवीपाडा येथे मोतीराम येवाजी बागुल (६५) या वयोवृद्धावर भर पावसात ताडपत्री खाली अंत्यविधी करण्याची वेळ आली. राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात विशिष्ट दबावाखाली सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडाला आहे. गेल्या चार वर्षाचा जरी विचार केला तरी १० वेळेस भरपावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर आलेली आहे.
-
या ठिकाणी ताडपत्रीखाली अंत्यविधी
पिळूकपाडा ( २३ सप्टेंबर २०२१), साबरदरा (८ जुलै २०२२), केळीपाडा (१४ जुलै २०२२), उंबरदे (९ जुलै २०२३), पळशेत ( १८ जुलै २०२३), चंद्रपूर (५ सप्टेंबर २०२३), वावरपाडा (११ सप्टेंबर २०२४), बिजूरपाडा (२६ ऑगस्ट २०२४)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने