दिंडोरी l मनोज पाटील:- राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि.1 ऑगस्ट रोजी महसूल दिन व दि.1 ते 7 ऑगस्ट रोजी दरम्यान महसूल सप्ताह दिंडोरी उपविभागात साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे उत्कृष्ट कार्य आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांची दखल घेऊन त्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर विविध स्तरांवरील कार्यालयांतून सात दिवसांसाठी खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिंडोरी - पेठ उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.
महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देणे, तसेच महसूल प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास वाढविणे, हा यामागचा उद्देश आहे. दि. 1 रोजी महसूल दिन व सप्ताह शुभारंभ, कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद, उत्कृष्ट कर्मचारी सन्मान लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण, दि. 2 रोजी 2011 पूर्वीपासून अतिक्रमण करून राहणार्या पात्र कुटुंबांना पट्टे वाटप कार्यक्रम, दि. 3 रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी व वृक्षारोपण, दि. 4 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणे, दि. 5 रोजी विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ऊइढ अनुदान वाटप, दि. 6 रोजी अतिक्रमण निष्कासन व शर्तभंग प्रकरणांवर कार्यवाही, दि. 7 रोजी च-डरपवधोरणाची अंमलबजावणी, महसूल सप्ताह सांगता समारंभ होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, विविध घटकांतील नागरिक यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. नागरिकांनी महसूल सप्ताहात सक्रीय सहभाग घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिंडोरी - पेठचे उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे यांनी केले आहे.