जोगमोडी l प्रतिनिधी:- जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या पुढाकाराने आणि माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर तसेच वैद्यकीय अधीक्षक पेठ येथील मा. डॉ. समाधान पाटील सर व तालुका आरोग्य अधीकारी डॉ. मोरे सर व डॉ हडपे सर व डॉ. सूर्यवंशी सर डॉ बच्छाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराअंतर्गत कॅन्सर तपासणी व्हॅन पुढील प्रमाणे भेट देणार आहे:
📅 दिनांक 14 जुलै 2025 – जोगमोडी आंबे, प्राथमिक आरोग्य केंद्र
या शिबिरामध्ये मुख कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या शिबिराचा लाभ घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबियांची तपासणी करून घ्यावी.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, याची जाणीव ठेवून या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.