महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कांदा प्रश्नावर विरोधी खासदार आक्रमक संसदेसमोर कांदा माळा घालत निदर्शने र.500 प्रती क्विंटल अनुदान हमीभाव देण्याची मागणी

दिंडोरी l मनोज पाटील- एकीकडे गुजरात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले जात असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जात नसल्याने राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी एकत्र येत खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्वाखाली कांदा प्रश्नावर कांद्याच्या माळा गळ्यात घालत जोरदार घोषणाबाजी करत संसद परिसर दणाणून सोडत कांद्याला प्रती क्विंटल 500 रुपये अनुदान, हमीभाव देण्याची मागणी केली आहे. मंगळवारी संसदेच्या मकर प्रवेश द्वारावर खासदार भास्कर भगरे, निलेश लंके यांनी सटाणा तालुक्यातील मोरे नगर येथील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा प्रश्नावर रेखाटलेले व्यंगचित्रं व गळ्यात कांदा माळ तसेच राजाभाऊ वाजे शोभाताई बच्छाव यांचे सह महाराष्ट्रातील खासदारांनी कांदामाळ घालत घोषणाबाजी केली,व संपूर्ण देशासह सत्ताधाऱ्याचे लक्ष कांदा प्रश्नावर वेधून घेतले. नाफेड आणि एनसिसिएफच्या च्या बोगस कांदा खरेदीचा पर्दाफाश करत निर्यातीला प्रोत्साहन व, तसेच गुजरात प्रमाणे कांद्याला तात्काळ ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांसाठी विरोधी खासदारांनी मागणी लावून धरली,संसद परिसर दणाणून सोडला, गेल्या १०/१२ दिवसांपासून कांदा उत्पादक व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी, उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची व्यंगचित्रे रेखाटुन निवेदनाद्वारे लक्ष वेधून घेतले होते, त्याची दखल घेत नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील खासदारांनी घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले, यात खासदार डॉ शोभा बच्छाव, भास्करराव भगरे , राजाभाऊ वाजे, डॉ. अमोल कोल्हे बजरंग सोनवणे, निलेश लंके, अरविंद सावंत आदी महाविकास आघाडीचे खासदार सहभागी झाले होते.

" अवकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले. कांद्याचे भाव रोज गडगडत आहे उत्पादन खर्च ही निघत नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहे.कांदा प्रक्ष्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. केंद्र सरकार या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे, गुजरात सरकारने कांद्यासाठी ३०० रूपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केले , ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही? तरी तात्काळ सर्व कांदा उत्पादकांना रु.५०० प्रति क्विंटल अनुदान द्यावे. नाफेड मार्फत बाजार समितीत कांदा खरेदी व्हावी. "
- भास्कर भगरे खासदार दिंडोरी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने