महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये मानव–बिबट संघर्ष, सर्पांविषयी जनजागृती

दिंडोरी l वैभव पगार - दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये मानव–बिबट संघर्ष, सर्पांविषयी जनजागृती व प्राथमिक उपचारांचे प्रात्यक्षिक वन्यजीव संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वनपाल अशोक काळे,शरद मोगरे, प्राचार्य शरद शेजवळ, वनरक्षक योगेश दळवी,वनसेवक शांताराम शिरसाठ,ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशनचे संचालक व सर्प–वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर,मंगेश चारोस्कर, वन्यजीव संशोधक प्रशांत हाडपे, अंकुश गुंड, उपप्राचार्य उत्तम भरसठ,पर्यवेक्षक डी के टोपले,आर एस शिंदे व कॉलेज विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रास्तविक संतोष कथार यांनी केले.
प्राचार्य शरद शेजवळ यांनी मार्गदर्शन करतांना मानव–बिबट संघर्ष टाळण्यासाठी व बिबट्यापासून संरक्षण करण्याची उपाययोजना व सहजीवनाची गरज अधोरेखित करताना तसेच सर्पांविषयी योग्य माहिती व सर्पदंशाच्या प्रसंगी करावयाच्या प्राथमिक उपचारांची जनजागृती करण्यासाठी दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमात वनपाल अशोक काळे सर यांनी विद्यार्थ्यांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्यांचे निवासस्थान, हालचालीचे मार्ग व मानव–बिबट संघर्ष वाढण्याची कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धती अवलंबून अशा घटना कशा टाळता येतील, याबाबत महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.
ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशनचे संचालक व सर्प–वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना मानव बिबट् सहजीवन तसेच अन्नसाखळी चे महत्त्व बाबत शास्त्रीय माहिती व विविध जातींच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून दिली. त्यांनी विषारी व अविषारी सर्पांमधील फरक, त्यांचे वर्तन, तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी, चुकीच्या उपचारपद्धतींचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता, संरक्षणाची भावना आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित झाली. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन नेहा देशमुख यांनी तर आभार बाळासाहेब रायते यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने