सुरगाणा l कृष्णा पवार:- शासकीय आश्रम शाळा सालभोये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व रक्षांबधन मोठया उत्साहात पार पडला . या कार्यक्रमाप्रंसगी वीर बिरसा मुडा तंट्या मामा राघोजी भागरे यांचे प्रतिमेला हार घालुन पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शालेय मुंलानी आदिवासी पोशाख करून वीर बिरसा मुंडा अवतार करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच गावामध्ये प्रभात फेरी काढुन आदिवासी दिनाच्या घोषणाने सालभोये परिसर दुमदुमा वुन सोडला. तसेच शाळेमध्ये विद्यार्थीनी विशाखा गवळी सुरज वाघमारे अशा अनेक विद्यार्थानी . भाषणे केली त्या नंतर शाळे मध्ये रसाबधनाचा कार्यकम करण्यात आला सर्व विद्यार्थीना राखी उपलब्ध करून देवून सर्व मुंलाना राख्या बांधण्यात आल्या तसेच शालेय व्यवस्थापण कमिटीचे अध्यक्ष भारत भोये तसेच उपाध्यक्ष वसंत वाघमारे तसेच स्कुल कमिटीचे सदस्य कृष्णा भोये हरिशचंद्र भोये, बळवंत भोये
, सुरेश भोये तसेच शाळेतील शिक्षक श्री बी डी भोये, श्री पी एस गवळी, श्री सिताराम गायकवाड, श्री एन आर खबाईत, श्री के बी गायकवाड, श्रीम एम आर बहिरम, श्रीम हौसा बहिरम, श्रीम मिना बनसोडे अधिक्षीका व शाळेचे मुख्याध्यापक श्री पी एच बागुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.