महाराष्ट्र ट्रायबल न्युज

बाऱ्हे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा ;या देशाचे खरे मालक आदिवासी - सहा.पोली.निरी. प्रदीप गिते.

बाऱ्हे l नामदेव पाडवी :- सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे आदिवासींचे प्रेरणास्थान आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन जागतिक आदिवासी दिनाची सुरवात करण्यात आली.
   डी.जे, बँड ला फाटा देत ढोल,पावरी,तारपा,टुगू या आदिवासी पारंपरिक वाद्याने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते देविदास गावीत यांनी केले.
     भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर भारतीय संस्कृती आगळी - वेगळी आहे.भारत देशाच्या निर्मिती पासून विचार केला तर,भारत देशाचे खरे मालक जर कोणी असेल तर ते आदिवासी बांधव आहेत.आणि या खऱ्याखुऱ्या मालकाचा हा आदिवासी दिवस,पारतंत्र्यच्या कालखंडात जागतिक आदिवासी दिवस सुरु झाला आहे.भारताचा इतिहास बघितला तर भारतावर परकीयांचे राज्य होते.एकोनाविसव्या शतकामध्ये क्रांतिसुंर्य, क्रांतिवीर, स्वातंत्र्यसेनानी या सगळ्यांनी आपल्यासाठी बलिदान दिले आहे.त्यामुळे आज सगळयांची आठवण काढणे गरजेचे आहे.
बिरसामुंडा,राघोजी भांगरे यांनी जिथे माणसाला बोलायची हिंम्मत नव्हती,स्वतःला आपले मत मांडयची हिम्मत नव्हती, परकीयांचे आक्रमण चालू असतांना आदिवासी बांधवावरती इंग्रजानी ज्या पद्धतीने जुलूमशाही, हुकुमशाही चालविली होती,त्या जुलमाविरुद्ध या क्रांतिकारकांनी स्वतः उभे राहून आंदोलन केले आहे.
बिरसा मुंडानी अवघ्या चोवीस-पंचवीस वर्षाच्या वयात आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी बांधवांसाठी घालवले आहे.या क्रांतिकारकांचे विचार लोकांपर्यंत पोहचले पाहिजे,तरुण पिढीला क्रांतिकारकांच्या कार्याची आठवण करून दिली पाहजे,आपल्यासाठी काय केल आहे याची जाणीव युवा पिढीला करून देणं गरजेचं आहे, क्रांतिकारकांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.याठिकाणी कुठलाही ढोल, ताशा,बँजो,डी.जे नाही एक चांगला उपक्रम राबवून आदिवासी पारंपरिक नृत्याने साजरा केला.
जागतिक आदिवासी दिन नाचून साजरा करण्यापेक्षा वाचून साजरा केला पाहिजे.आपण जल,जंगल,जमीन जपणारी माणसे आहोत,आदिवासी माणूस खेड्यापाड्यात,जंगलात राहणारा माणूस आहे.आपली संस्कृती,वागण,राहणीमान वेगळ आहे,ही संस्कृती जतन करण्यासाठी आदिवासी दिवस साजरा झाला पाहिजे.ही संस्कृती पुढे चालू राहिली पाहिजे. या पिढीला जान राहिली पाहिजे त्यासाठी एक संकल्प केला पाहिजे कि,समाज चांगल्या दिशेकडे गेला पाहिजे,मुलां-मुलींना शिक्षणाकडे पाठवले पाहिजे,अल्पवयात लग्न करणार नाही,व्यसनपासून दूर ठेवले पाहिजे,परिस्थिचे कारण न देता मुलां - मुलींना शिकविले पाहिजे.असे सखोल मार्गदर्शन बाऱ्हे पोलीस ठाणे सहा.पोली.निरी प्रदीप गिते यांनी आदिवासी बांधवाना केले .
    यावेळी संघर्ष आदियुवा प्रतिष्ठाण महाराष्ट्र - गुजरात मार्गदर्शक देविदास गावीत, माजी सरपंच परसराम वार्डे, हुशार देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ धूम,भास्कर वार्डे,रामदास जाधव, पोलीस पाटील हंसराज खंबाईत, सरपंच राजेंद्र निकुळे, उपसरपंच नामदेव पाडवी,दिपक देशमुख,जगदीश पाडवी,राकेश जाधव,संजय पाडवी,चिंतामण वार्डे,पांडुरंग धूम,मनोज देशमुख,प्रा.शि.देविदास देशमुख,बाऱ्हे परिसरातील आदिवासी बांधव,बाऱ्हे पोलीस ठाण्याचे कर्मचारी,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. बाऱ्हे पोलीस ठाणे सहा. पोली. निरी. प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने