दिंडोरी- मनोज पाटील :- प्रशासनाची खरी शक्ती ही जनतेच्या सेवेत असल्याचे प्रतिपादन दिंडोरी पेठ उपविभागीय अधिकारी डॉ आप्पासाहेब शिंदे यांनी केले.
दिंडोरी येथील उपविभागीय कार्यालयात महसूल दिन व सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थायावरून शिंदे बोलत होते.ते पुढे म्हणाले महसूल विभाग हे शासनाचे मूलभूत व महत्त्वाचे अंग आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्नांचे निराकरण हे महसूल विभागाशी निगडित असते. जमिनीचे सातबारा, फेरफार, नामांतरे, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, मालमत्ता मूल्यांकन, आपत्ती व्यवस्थापन, निवडणुका, सामाजिक सुरक्षा योजना—अशा अनेक क्षेत्रांत महसूल विभाग कार्यरत आहे.
महसूल दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून, तो आपल्या कार्यातील पारदर्शकता, उत्तरदायित्व, वेगवान सेवा व जनतेशी निगडित असलेल्या समस्यांबाबत संवेदनशीलतेचे स्मरण करून देणारा दिवस आहे.
लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श उभा करणे हे आपले कर्तव्य आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. आप्पासाहेब शिंदे होते.व्यासपीठावर तहसीलदार मुकेश कांबळे, परिक्षविधींन उपजिल्हाधिकारी दीपा देठे, नायब तहसीलदार चैताली दराडे,मंदाकिनी काथेपुरी ,वसंतराव धुमसे,सुरेश बकरे, महेंद्र मोतीराय, दुय्यम निबंधक संदीप भुसारी, पुरवठा निरीक्षक अक्षय लोहारकर, पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष चिंतामण पाटील मोरे, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संतोष कथार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पूजन करून पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तलाठी वाघ यांनी महाराष्ट्र राज्य गीत सादर केले.
यावेळी महसूल दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हाधिकारी विभागात उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित असलेले उपविभागीय अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे यांचा तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, चिंतामण पाटील मोरे, संतोष कथार यांनी मनोगत व्यक्त करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महसूल दिनाच्या निमित्ताने यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे नायब तहसिलदार वसंत धुमसे,श्रीमती मंदाकिनी काथेपुरी ,महसूल अधिकारी श्रीमती रुपाली वाघेरे,शाम सावजी,मंडळ अधिकारी पांडुरंग बॉंडे,समाधान निकुंभ,दिगंबर राऊत,मच्छीन्द्र जगताप,सुनील जाधव,ओमकार खराटे,पोलीस पाटील शंकर तुंगार,आदींना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सूत्रसंचालन व प्रास्तविक तुषार वाघ यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.