महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जोरण जि.प.शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

ननाशी| विनोद गायकवाड:-आनंदी सहवास सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने जोरण (ता.दिंडोरी)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
    जोरण येथील जि.प.शाळा उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.आदिवासी भागातील शाळा असल्याने सामान्य पालकांचे पाल्य या शाळेत शिक्षण घेतात.त्यांच्या शैक्षणिक विकासात शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये यासाठी सेवा निवृत्त विस्तार अधिकारी सोनार यांच्या आनंदी सहवास सेवाभावी संस्थे मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
   आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होईल अशी भावना पालक आणि शिक्षक यांनी यावेळी व्यक्त केली.
     यावेळी सरपंच मंगेश लोखंडे,उप सरपंच गोविंद गायकवाड,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गोरख बोडके,मुख्याध्यापक रोहिदास चव्हाण,शिक्षक कल्याण कुडके,स्वाती कड यांचेसह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने