महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ग्रामीण रुग्णालय पेठ येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिरचे आयोजन

पेठ l प्रतिनिधी:- जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या पुढाकाराने आणि माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे साहेब तसेच वैद्यकीय अधीक्षक पेठ येथील मा. डॉ. समाधान पाटील सर व डॉ हडपे सर व डॉ सूर्यवंशी सर व डॉ बच्छाव सर व डॉ बांगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दि.21 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामीण रुग्णालय पेठ येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
    या शिबिरामध्ये मुख कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
 सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या शिबिराचा लाभ घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबियांची तपासणी करून घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने