महाराष्ट्र ट्रायबल न्युज

प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सुरगाणा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सुरगाणा l कृष्णा पवार:- प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक ललित शिंदे सर होते. त्यांच्या हस्ते विधिवत ध्वजारोहण करण्यात आले.
   यानंतर विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण कवायत, तालबद्ध लेझीम, आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच देशभक्तीने भारलेली भाषणे सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. मुलांच्या ओघवत्या व प्रभावी भाषणांना प्रेक्षकांकडून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना सोनपापडी वाटप करण्यात आले.
     या प्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सदू बोरसे, माध्य. शिक्षक भोलानाथ पवार,  रामभाऊ बागुल,सचिन महाले, शितल अहिरे ,  अमोल पवार(भाऊसाहेब) ,भिमराव पवार प्र.शा. परीचर ,
 प्राथ.शिक्षक गोतम लोखंडे, जगन जाधव, चुनिलाल बागुल,  रामसिंग ठोके ,विजया जोपळे, अंकुश भुसारे,राहूल पवार अधिक्षक जयवंत जोपळे ,अधिक्षिका यशोदा गवळी व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदतसेच इतर मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने