महाराष्ट्र ट्रायबल न्युज

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये समाजदिन मोठ्या उत्साहात साजरा

वैभव पगार l दिंडोरी :-दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात जयंती तथा मविप्र समाज संस्था समाज दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे होते.
समाज ध्वजारोहण जेष्ठ सभासद बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
    कार्यक्रमास माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, अभिनव बालविकास मंदिर स्कूल कमिटी अध्यक्ष दौलत दादा उखर्डे, जेष्ठसदस्य शिवाजी भाऊ जाधव, बाळासाहेब जाधव, गुलाब तात्या जाधव,साहेबराव शिंदे, कैलास मवाळ,सुभाष बोरस्ते, गंगाधर निखाडे,मधुकर जाधव, दिलीप शिंदे, गणपत दादा जाधव,वाळू जगताप,मनोज ढिकले,रणजित देशमुख,साहेबराव घोलप,सतीश वाघ, विठ्ठलराव पालखेडे,प्राचार्य शरद शेजवळ,डी.एड कॉलेज प्राचार्य डॉ संजय काळोगे होरायझन इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला जाधव,उपमुख्याध्यापक उत्तम भरसठ, अभिनव बालविकास मंदिर मुख्याध्यापिका श्रीमती पवार ,पर्यवेक्षक डी के टोपले, आर एस शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
  राष्ट्रगीत व समाज गीत, इसस्तवन ,विद्यालयाच्या संगीत शिक्षिका सौ. अपर्णा देशपांडे व गीत मंच यांनी सादर करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. 
प्रास्तविकात बोलतांना प्राचार्य शरद शेजवळ यांनी "संस्थेची स्थापना कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी जरी 1914 ला केली तरी तिचे विचारांचे बीज मात्र 1913 मध्येच रोपण झाले. धुळे येथील साहित्य संमेलन अधिवेशनातून प्रेरणा घेऊन रावसाहेबांनी लावलेले इवलेसे रोपटे ते म्हणजे उदाजी बोर्डिंग. अवघ्या पाच विद्यार्थ्यांवर सुरू केलेले हे ज्ञान विकासाचे कार्य या कार्याला विचारांचे खत पाणी त्यागाची जोड देत कर्मवीरांनी ज्ञानविकास बहुजन समाजाचा विकास करण्याची धडपड बघून राजर्षी शाहू महाराजांनी देखील या कार्यास सढळ हाताने देणगी दिली.कर्मवीरांच्या कार्याची माहिती सांगून त्यांच्या कार्याबद्दल मानवंदना दिली.
 उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयात दात्यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याज रोख रक्कम बक्षीस स्वरूपात इयत्ता दहावी बारावी मध्ये भरघोस गुणांनी उत्तीर्ण होणारे गुणवंत विद्यार्थी यांना बक्षीस स्वरूपामध्ये देण्यात आले विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कुमारी कृतिका वाळके व मयुरी ठेपणे यांनी कर्मवीरांचे महान कार्य व शिवशाही ते लोकशाही यातील विचारधारा मनोगतातून व्यक्त केले विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती नेहा देशमुख यांनी कर्मवीर रावसाहेब यांनी घेतलेला ज्ञानाचा वसा संस्थेची स्थापना ते आज पर्यंत संस्थेचा कर्मवीरांनी केलेला विकास त्यांच्या कर्तृत्वाची महान विचारधारा या सर्वांचे आढावा विचारांतून व्यक्त केला .मान्यवरांपैकी गंगाधर निखाडे यांनी बोलतांना कर्मवीरांचा आदर्श घेऊन पुढील पिढीने कार्य करावे असे आव्हाहन केले.
   उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यालयातील पाचवी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी रेखाटन केलेल्या कर्मवीरांचे चित्र रांगोळी प्रदर्शन व पुष्परचना प्रदर्शन हॉलचे उद्घाटन केले व कर्मवीरांच्या रांगोळ्या बघून त्यांचे मन खऱ्या अर्थाने भारावून गेले व रांगोळी रेखाटन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुकही केले
   अभिनव बालविकास मंदिर चे विद्यार्थी कर्मवीरांची वेषभूषा परिधान करून आले होते.
   सूत्रसंचालन संतोष कथार व श्रीमती सरला कदम यांनी तर आभार श्रीमती सुमन विरकर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने