महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वणी ग्रामीण रुग्णालयात मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन.

वणी :-  ग्रामीण रुग्णालय वणी येथे मंगळवार दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी मोफत कर्करोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी ठीक ०९:०० ते २:०० वाजेपर्यंत चालणार असून नागरिकांना मुखाचा कर्करोग, गर्भशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग याची तपासणी मोफत करून घेता येणार आहे. विशेष म्हणजे तपासणीत कर्करोगाची लक्षणे आढळून आल्यास सबंधित रुग्णाला पुढील सर्व उपचार पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.
    जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय आधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील, डॉ. राहुल हाडपे, डॉ. वैभव बच्छाव, मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. सोनल गायधनी आणि तालुका आरोग्य आधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित केले जात आहे. तपासणी बाबत अधिक माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

समुपदेशक - तुषार दुसाने ९४०३४४४०९९
समुपदेशक - स्वाती उबाळे ९६०४२७७७८१

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने