महाराष्ट्र ट्रायबल न्युज

तळेगाव दिंडोरी येथे बस थांब्याचे उद्घाटन महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे पाऊल...

वैभव पगार l दिंडोरी :- तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधत. नवीन बस थांब्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या बस थांब्यामुळे परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी,शेतकरी वर्गाला प्रवासाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. या उद्घाटना प्रसंगी प्रमुख उपस्थिती उपसरपंच प्रवीणभाऊ कथार, पोलीस पाटील रोशनदादा परदेशी, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार सर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कांतिलाल नाना घुगे,दिगंबर ढाकणे,मुंबई रेल्वे पोलिस सुरज ढाकणे,यांच्या शुभ हस्ते फलकाचे पुजन करून व श्रीफळ फोडण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील तरुण युवक शेतकरी, ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यामध्ये सोसायटीचे माजी चेअरमण गोविंद ढाकणे,माजी उपसरपंच बाळासाहेब चकोर,माजी ग्रा.पं.सदस्य राजेंद्र ढाकणे, सोसायटीचे संचालक सुनिल ढाकणे,सुरेश घुगे,रविंद्र ढाकणे,दिगंबर ढाकणे अजिंक्य ढाकणे, गोकुळ चौधरी, प्रशांत ढाकणे, अमोल ढाकणे,संजय ढाकणे,हेमंत कांगणे,धनंजय ढाकणे, संदिप ढाकणे,गणेश ढाकणे, गौरव ढाकणे,शुभम ढाकणे,बाळू निंबाळकर यांच्या समावेश होता. या थांब्याच्या स्थापनेसाठी केशव घुगे यांनी विशेष प्रयत्न केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नाशिक सिटी लिंक बस थांब्याजवळ थांबून बस चालक रवींद्र सोनवणे व वाहक करण डोंगरे यांच्या शाल,श्रीफळ, गुलाब पुष्प, देऊन सत्कार करण्यात आला. या बस थांब्यामुळे परिसरातील महाविद्यालयीन, शेतकरी, नागरिकांना प्रवासासाठी अधिक सुरक्षित व सुलभ सुविधा मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने