दिंडोरी l प्रतिनिधी:-जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या पुढाकाराने आणि माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप सूर्यवंशी सर
अतिरिक्त जिल्ह्या शल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील सर ,डॉ. राहुल हडपे सर, डॉ. वैभव बच्छाव सर ,डॉ.शिल्पा बांगर मॅडम तसेच वैद्यकीय अधीक्षक दिडोंरी येथील डॉ. हेमंत घांगळे सर , तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 19 ऑगस्ट 2025
या शिबिराअंतर्गत मुख कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांची मोफत तपासणी करण्यात आली.