महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आश्रमशाळा शिरसगाव येथे बैल पोळा सण पुरणपोळी च्या जेवणाचा आस्वाद घेत उत्साहात साजरा.

ञ्यंबकेश्वर l प्रतिनिधी:- दि.२२ आॕगस्ट २०२५ शुक्रवार रोजी शासकीय आश्रमशाळा शिरसगांव ता. ञ्यंबक जि. नासिक येथे खेडेगावात ज्या प्रकारे बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो त्याच प्रकारे शाळेतच विद्यार्थ्यांना या सणा विषयी माहीती व्हावी तसेच घरची आठवण येऊ नये म्हणून गावातील रंग बिरंगी सजवलेल्या बैलांना आणुन त्यांची पुजा करुन पुरण पोळी चारत बैल पोळा सण साजरा करण्यात आला.
    या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या घरी या सणानिमित्त जे जेवण बनवले जाते त्या जेवणाचा आस्वाद घेत आनंदमय व जल्लोषात शाळेतच हा सण साजरा करण्यात आला.
   हा उत्सव / सण साजरा करण्याची कल्पना शाळेचे मुख्याध्यापक दिपक भास्कर यांनी मांडल्या नंतर अधिक्षिका पुणम बावणे, अधिक्षक अरुण बागले यांनी आयोजन करुन अनुसया गायकवाड, लीलाबाई महाले, कमल कोंगील,आरती वाघमारे, किसन टबाले, हेमराज धुम, पुंडलिक सहारे,व उषा गावित, राहुल वारडे या कर्मचाऱ्यांनी आजचे पुरण पोळीचे जेवण बनविण्यासाठी मेहनत घेतली. 
       हा सण साजरा करण्यासाठी शाळा व्य.समिती अध्यक्ष अरुण भाऊ महाले, सरपंच भागिरथी महाले, उपसरपंच भगवान भाऊ महाले, नाना महाले, कला शिक्षक अशोक भोये, आरोग्य परिचारीका निर्मला महाले,हिरामण टोपले यांनी मदत व सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने