निळवंडी । मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यातील निळवंडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शंकर बबन पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
निळवंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसाहेब पाटील यांनी रोटेशन पध्दतीने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक सरपंच मनिषा अनिल चारोस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शंकर बबन पाटील यांच्या उपसरपंचपदासाठी सूचक म्हणून उपसरपंच भाऊसाहेब पाटील होते तर अनुमोदन ग्रामपंचायत सदस्य भास्कर गवारी यांनी दिले. यावेळी उपसरपंचपदासाठी शंकर बबन पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र पवार यांनी जाहीर केले. यावेळी निवडणूक यशस्वीसाठी क्लार्क अनिल पाटील, शिपाई माधव चारोस्कर यांनी परिश्रम घेतले. यावेळी शंकर पाटील यांची उपसरपंचपदी निवड होताच कार्यकर्त्यांची गुलालाची उधळण करत फटाक्याची आतशबाजी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी नवनर्विाचित उपसरपंच शंकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रा.पं. सदस्या रोशनी बोंबले, पोपटराव पाटील, अनिल चारोस्कर, नंदु पाटील, मनोज पाटील, शशीकांत पाटील, रविंद्र पाटील, साईराम बोंबले, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, आनंदा पाटील, चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, साहेबराव चारोस्कर, संदीप पाटील, भगवान डंबाळे, राजु पवार, अनिल पाटील, अमोल पाटील, रामा पाटील, शंकर जाधव, भुषण पाटील, दर्शन पाटील, गोरख घुटे, सुनील चारोस्कर आदी उपस्थित होते.