वणी l प्रतिनिधी:- वणी येथील मविप्र समाजाचे के आर टी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि आश्रय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम सोमवार 25 ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात थॅलेसेमिया आजार, थॅलेसिमिया जनजागृती कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एस एस काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळीग्रामिं भागातील विद्यार्थ्याना न्यूट्रिशनबद्दल ज्ञान नसल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते त्यामुळेमुळे आरोग्य सुधारण्यास अश्या कार्यक्रमांची गरज आहे असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. आश्रय या सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टचे सचिव प्रा. प्रकाश पंगम यांनी आपल्या भाषणात थॅलेसेमिया आ०णि ॲनिमियाचा प्रसार, वैद्यकीय वर्गीकरण, जोखीम, लक्षणे, निदान, गर्भावस्थेतील तपासणी, जन्मानंतरची तपासणी, उपचार पद्धती, प्रतिबंध आणि आहाराच्या शिफारसी यावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, थॅलेसेमिया असलेल्या महिलांना निरोगी गर्भधारणा शक्य आहे का,संतुलित आहार, चहाचे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांमधील आयर्नच्या कमतरतेची कारणे यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाय एम साळुंके यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत मार्गदर्शन केले यांनी थॅलेसेमिया रुग्णांचे अनुभव आणि संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले.. सूत्रसंचालन डॉ आर आर चव्हाण यांनी केले तर प्रा उमेश देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले
या कार्यक्रमाला गुरुप्रसाद नाईक, आयक्युएसी समन्वयक प्रा. नितीन बोरसे, डॉ जे डी पवार,प्रा बी टी ठाकरे इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.