त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित, श्रीगुरुजी रुग्णालयात नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव ता. ञ्यंबक जि. नासिक येथे दि. १९ ते २० आॕगस्ट २०२५ या कालावधीत विद्यार्थ्यांनसाठी नेत्र रोग (डोळ्यांचे विकार) बाबत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीर अंतर्गत श्रीगुरुजी रुग्णालयात नासिक येथील डाॕ. रेवती कुलकर्णी व व्यवस्थापक निलेश पवार यांच्याकडुन ५४५ विद्यार्थ्यांची नेञ रोग समस्या बाबत तपासणी करण्यात आली.
या शिबिरात तपासणी नंतर डोळ्यांचे आजाराबाबत समस्या असलेल्या १५ विद्यार्थ्यांना चष्मे,१० विद्यार्थ्यांना औषधे व ८ विद्यार्थ्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणी शिबिरासाठी शासकीय आश्रमशाळा शिरसगाव येथील मुख्याध्यापक दिपक भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षिका पुणम बावणे,अधिक्षक अरुण बागले,आरोग्य सेविका यमुना महाले, शिक्षकवृंद, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यानी आयोजन व नियोजन केले.