महाराष्ट्र ट्रायबल न्युज

वणी ग्रामीण रुग्णालयात मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

वणी l प्रतिनिधी:- वणी ग्रामीण रुग्णालयात मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी नऊ ते दोन पर्यंत मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ,यात मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग तपासणी करण्यात येईल. या शिबिराचा लाभ घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी सर, डॉ. वैभव बच्छाव सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक 26 ऑगस्ट रोजी या शिबिरा अंतर्गत मुख कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनाली गायधनी मॅडम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने