सुरगाणा l कृष्णा पवार:- दि.26 रोजी बांबू कॉसमॉस फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चिंचपाडा (गुही) सुरगाणा यांच्या वतीने भदर येथे कंपनीची ४ थी वार्षिक सर्व साधारण सभा आयोजित करण्यात आली .
शेतकरी बांधवांसाठी बांबू शेती व त्यावर आधारित विविध वस्तू तयार करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे आर्थिक महत्त्व, प्रक्रिया उद्योग तसेच रोजगार निर्मितीच्या संधी याची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे पदाधिकारी मा.रमेश थोरात, उपाध्यक्ष गोपाळ धूम, आवजी पालवी , अध्यक्ष मनोहर महाले, सचिव तुळशीराम सहारे, आशा सहारे, दौलत गावित ,ग्रामपंचायत भदर च्या सरपंच सौ.झंपाताई थोरात,कंपनी चे CEO राहुल पवार, चित्रा धूम , संतोष सहारे तसेच सिन्नर युवा मित्र प्रतिनिधि विकास जेऊघाले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसोबतच मूल्यवर्धनाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
भदरसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमातून शेतकऱ्यांना बांबू शेतीद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश मिळाला.