दिंडोरी l वैभव पगार :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी येथील महाविद्यालयात शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ संजय काळोगे सर हे होते. तर प्रमुख वक्ते प्रा. धामणे एम.आर.होते. प्रा. धामणे सरांनी आपल्या भाषणात लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचा सुस्पष्ट अभ्यासपूर्ण, व्यापक विचार, अफाट बुद्धिमत्ता, सर्व विषयावर प्रभुत्व या संदर्भातील विविध प्रसंग, त्यांनी सांगितलेली चतु:सूत्री, केसरी व मराठा वृत्तपत्र यामधील प्रखर लेखन, लोकमान्य टिळकांचे जाज्वल्य विचार, तुरुंगवास व त्यामधील अनुभव. तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील समाज व्यवस्थेला चपराक देणारे विविध प्रसंग, त्यांचा मुंबईचा खडतर प्रवास, मुंबईमधील विविध प्रसंग, शिकण्याची धडपड, त्यांचे साहित्य, रशियातील स्टॅलिनग्राड चा पोवाडा, साहित्याचे जगातल्या 27 भाषेत झालेले भाषांतर, त्यांनी मांडलेले रशियातील विचार, विविध देशातील त्यांची लोकप्रियता, त्यांची ग्रंथसंपदा यासंदर्भात उहापोह केला. कार्यक्रम प्रसंगी प्रथम वर्ष छात्राध्यापिका कु.तृप्ती वाघेरे, दिपाली भांगरे, रिद्धी वाघेरे व रोहीणी बागुल यांनीही आपल्या भाषणात आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या बद्दल महत्त्वपूर्ण माहिती सांगितली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय काळोगे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनसंघर्ष, गावाविषयी असणारी ओढ, व शिवाजी महाराजांप्रती असणारे प्रेम, आण्णाभाऊंचे साहित्यातील योगदान यावर सविस्तर माहिती सांगितली.
सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ अनिल भोळे, उपप्रमुख प्रा श्रीमती स्मिता ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष छात्राध्यापिका कु. महाले साक्षी हीने केले तर आभार कु. पायल शार्दूल हीने मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.श्रीमती महाले ए.के., प्रा.श्री.शिंदे एस.जे. श्री.ठोंबरे जे.आर., श्रीमती जगताप पी.जी., ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली, क्रिडा शिक्षक लिलके बी.एम.श्री बाबा मोरे, श्री कराटे, नारायण वरखेडे,कदम,गावित,उखर्डे आदीं बरोबर प्रथम वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले.