महाराष्ट्र ट्रायबल न्युज

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदेदिगर येथे ‘एक पेड मा के नाम’ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

बाऱ्हे - नामदेव पाडवी :- आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदे दिगर तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे ‘एक पेड मा के नाम’ योजनेअंतर्गत शाळेच्या इको क्लब मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
  सदर कार्यक्रमासाठी वन विभागामार्फत काही रोपे उपलब्ध झाली होती. परंतु प्राचार्य प्रशांत सावळे यांनी नवीन पूर्णत्वास येत असलेल्या शालेय परिसरात वृक्षारोपण करून ज्यावेळी वर्षभरात विद्यार्थी सदर ठिकाणी हजर होतील त्यावेळी त्यांना शालेय परिसर हिरवागार मिळेल व अशा वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी संकल्पना मांडली व पालकांना देखील शाळेसाठी वृक्ष दान करण्याचे आवाहन केले. पालकांनी देखील सदर आवाहनास मोठा प्रतिसाद देऊन शाळेसाठी आंबा, लिंब, पेरू, शोभेची वृक्ष इत्यादी वृक्ष देऊ केले. बऱ्याच पालकांनी दूरवरून येऊन सदर प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी, उपाध्यक्ष श्रीम. सुनिता चौधरी, सदस्य संतोष जोपळे, माधव पवार, श्री महेश देशमुख यांनी चोख नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. सदर कार्यक्रमासाठी शिंदे दिगर गावचे सरपंच पुंडलिक पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाप्रसंगी वेगवेगळ्या प्रकारची सुमारे दोनशे रोपांची लागवड करण्यात आली. प्राचार्य प्रशांत सावळे यांनी याप्रसंगी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे आयुक्त लिना बनसोड, उपआयुक्त श्रीम. विनिता सोनवणे यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास प्रोत्साहित केल्यामुळे सदर कार्यक्रम करणे शक्य झाल्याचे नमूद केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी शिंदे दिगर गावचे सर्व ग्रामस्थ, शाळेचे व्यवस्थापन समिती सदस्य व उपस्थित पालक यांचे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शिंदेदिगर शाळेचे प्राचार्य प्रशांत सावळे सर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने