महाराष्ट्र ट्रायबल न्युज

क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन व प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश स्वागत समारंभ

दिंडोरी l वैभव पगार :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी येथील महाविद्यालयात शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन व प्रथम वर्ष विद्यार्थी प्रवेश स्वागत समारंभ कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ संजय काळोगे सर हे होते. तर प्रमुख वक्ते प्रा. शिंदे एस.जे होते. प्रा. शिंदे सरांनी आपल्या भाषणात भारताला स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीकारकांचा सहभाग व स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीसिंह नानासाहेब पाटील, भगतसिंग, राजगुरू सुकदेव अशा क्रांतीकारकांनी केलेल्या बलिदानाविषयी सखोल व विस्तृत माहिती सांगितली.कार्यक्रम प्रसंगी प्रथम वर्ष छात्राध्यापिका कु. सपना गावित, कु. साक्षी महाले, कु. सविता तरवारे यांनीही आपल्या भाषणात आदिवासी लोकांची संस्कृती, त्यांची राहणीमान, भाषा, व निसर्गाप्रती असणारे प्रेम यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रथम वर्षाला नवीन प्रवेशित झालेल्या छात्राध्यापकांचा सत्कार द्वितीय वर्ष छात्राध्यापकांनी गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तसेच प्रथम वर्ष डी.एल.एड. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एक ते पाचमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार प्राचार्य डॉ. संजय काळोगे सर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जनता इंग्लिश स्कूलमधील शिक्षिका श्रीमती. बागुल मंगला यांना श्रीलंकेत झालेल्या ऍंथलॅंटिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय काळोगे सर यांनीही अनेक क्रांतीकारकांचे योगदान यावर सविस्तर माहिती सांगितली तसेच आदिवासी लोकसंस्कृती, त्यांचात असलेला प्रामाणिकपणा, इतरांबद्दल असलेला आदर, निसर्गाप्रती असलेला प्रेम,भाव यावर प्रकाश टाकला. 
               सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.डॉ अनिल भोळे, उपप्रमुख प्रा श्रीमती स्मिता ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन प्रथम व द्वितीय छात्राध्यापकांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष छात्राध्यापिका कु.वाघ धनश्री द्वितीय वर्ष छात्राध्यापिका कु.फंड मृणाल, बोरसे शीतल ह्यांनी केले.तर आभार कु.गायकवाड तेजस्वीनी हीने मानले, फलक लेखन शितल गायकवाड, धनराज धूम यांनी केले, तसेच पंकज भोये, दिपक महाले, यांनी फोटो काढले प्रथम वर्ष छात्राध्यापिका साक्षी महाले, निकिता आहिरे व द्वितीय वर्ष छात्राध्यापिका योगिता वाघोरे, सविता धुळे सुवर्णा चौधरी यांनी आदिवासी नृत्य करून कार्यक्रमांची शोभा वाढविली तसेच गायत्री रारुत, पंकज भोये, गोकुळ झिरवाळ यांनी आदिवासी वेशभुषा परिधान करून उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका श्रीमती.डॉ.जगताप पी.जी. श्री.धामणे एम.आर.,श्री.ठोंबरे जे.आर., ग्रंथपाल श्रीमती पाटील सोनाली, क्रिडा शिक्षक लिलके बी.एम.श्री बाबा मोरे, श्री कराटे केशव, श्री नारायण वरखेडे, श्री ज्ञानेश्वर कदम,श्री प्रभाकर गावित, श्री सोमनाथ उखर्डे आदीं बरोबर प्रथम व द्वितीय वर्ष छात्राध्यापकांचे विशेष योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने