महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जागतिक युवा दिनानिमित्त HIV/AIDS व अवयव दानाविषयी जनजागृती

कळवण l प्रतिनिधी :- दि.१३ ऑगस्ट २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय कळवण वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत पवार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय बंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, आयसीटीसी (ICTC) व राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) मार्फत आदिवासी सेवा समिती संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मानूर येथे जनजागृती कार्यक्रम पार पडला.
    कार्यक्रमात HIV/AIDS आजाराविषयी सखोल माहिती तसेच राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच अवयव दानाविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी अवयव दानाची शपथ घेतली.
    मार्गदर्शक म्हणून आयसीटीसी समुपदेशक श्री. शरद चव्हाण व आरकेएसके समुपदेशक श्री. अनिल चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे मा. प्राचार्य, शिक्षकवर्ग, सहकर्मचारी आणि एकूण ४७ विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने