नाशिक l प्रतिनिधी :- 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त "आदिवासी कला - संस्कृती महोत्सव" या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाशिक येथे करण्यात आले होते. या महोत्सव निमित्ताने आदिवासी नृत्यकला, वकृत्व, काव्य, चित्रकला या विविध स्पर्धाचे आयोजनसह रक्तदान शिबिर भरविण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य विभागाचे माजी उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये होते. कार्यक्रमाची सुरवात आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून धरतीमाता, कणसरीमाता पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन खंबाईत यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर रंजनाताई भानसी , आदिवासी साहित्यिक रवी बुधर, देवचंद महाले , तुकाराम चौधरी, आदिवासी बचाव अभियानचे अशोक बागुल सर, किसन ठाकरे , राम चौरे, के.के.गांगुर्डे, तानाजी बहिरम, माजी सभापती महेश टोपले, शिक्षक संघटनेचे संजय भोये, दिलीप भुसारे, कोकणा- कोकणी संघटनेचे जयवंत गारे, नामदेव बागुल, चिंतामणी गायकवाड,आदिवासी कर्मचारी संघटनेचे उत्तम झिरवाळ , भाऊसाहेब गावित, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पवार, सुरेखा ठाकरे, गायत्रीताई इंपाळ, गायक योगेश चौधरी, हास्य कलाकार राजेंद्र गांगोडे, मयूर बागुल, सुरेंद्र चौरे तसेच संकल्प आदियुवा संघटनेचे पदाधिकारी डाँ.राजेंद्र बोरसे, कांतिलाल नाठे, शिरीष चौधरी, धर्मराज महाले, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमा निम्मिताने *आदिवासी नृत्यकला स्पर्धा* मोठ्या उत्साहाने पार पडल्या .यामध्ये
*प्रथम क्रमांक* - शासकीय आश्रमशाळा ननाशी ता.दिंडोरी
*द्वितीय क्र.*-बालकलाकार गट नाशिक
*तृतीय क्र.* - ट्रायबल ट्यून धाब्याचापाडा ता.पेठ
*चतुर्थ क्र.*- रांझाळ बॉईज टीम पेठ व
*उत्तेजनार्थ क्र.* - नारी गृप जिरवाडे ता. कळवण ...... या सामुहिक नृत्यकला संघानी पटकावला. या स्पर्धेत एकूण 22 कलापथकांनी सहभाग नोंदवला. आदिवासी नृत्यकला स्पर्धेतील डान्स ग्रुपचा पाहुण्यांच्या हस्ते ट्राँफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ भोये व परसराम पाडवी सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी किरण खंबाईत, सुनील गांगुर्डे, कांतिलाल मोरे, राकेश गांगुर्डे, मनोहर खंबाईत, कैलास गावित, महेंद्र खंबाईत , रमेश चौधरी,विजय घुटे आदी सदस्यांनी प्रयत्न केले. एकलव्य अभ्यासिका व कणसरामाता मित्रमंडळ नाशिक यांचे सहकार्य लाभले.