महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अथक प्रयत्नांनंतर म्हेळूस्के येथील बिबट्या पिंजऱ्यात

दिंडोरी l वैभव पगार:- दिंडोरी तालुक्यातील म्हेळूस्के येथे गेल्या अनेक दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे.
   म्हेळूस्के गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याने दहशत माजवली होती जनावरे, कुत्रे, वासरे यांच्यासह अनेक पाळीव प्राण्यांवर देखील हल्ले करून ठार केले दिवसा व रात्री देखील बिबट्यांचे नेहमी सर्वांना दर्शन होत आहे. त्यामुळे शेतातील कामे करण्यास देखील मजूर येत नाहीत. व आताही अनिल मेधने यांच्या वस्तीवर बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार केले होते. त्या मुळे वनविभागाने तीन दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता, विशेष म्हणजे पिंजरा लावल्यापासून सलग दोन दिवस बिबट्या पिंजऱ्यात येत होता, परंतु पिंजऱ्याची खालची प्लेट बिबट्या उचकवत असल्याने जेरबंद होत नव्हता. स्थानिक शेतकऱ्यांनी पिंजऱ्याची किरकोळ दुरुस्ती केली असता आज सलग तिसऱ्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने