महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, ननाशी येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा

ननाशी l प्रतिनिधी :- जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, ननाशी येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून गावातून लेझीम पथकासह भव्य मिरवणूक काढली तसेच पारंपारिक लोककलेचे दर्शन दाखवण्यात आले.
  यावेळी  कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अहिरे डी.एन., पवार सर, शिंदे सर, सूर्यवंशी सर, अहिरे सर, पानसरे सर, बनकर सर, जाधव सर, चौधरी मॅडम, तसेच उच्च माध्यमिक विभागाचे प्रा. पवार सर, सूर्यवंशी सर, पगार सर, गरुड सर, देवरे सर, आहेर सर, भोकनळ सर, सोनवणे मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी संस्कृती, परंपरा आणि निसर्ग पूजेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने