महाराष्ट्र ट्रायबल न्युज

ननाशी आश्रमाशाळेत करिअर मार्गदर्शन उपक्रम.

ननाशी | विनोद गायकवाड:- येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आदिवासी जनजाती गौरव पंधरवड्यानिमित्त नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात करिअर कसे करावे यासाठी व्याख्याते निशांत भावसार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी निशांत भावसार यांनी दहावी आणि बारावी नंतरचे करिअर याबाबत मार्गदर्शन केले.तसेच दहावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे आणि बारावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांनी करिअर निवडतांना अतिशय सजग राहून निवडावे असे आवाहन भावसार यांनी यावेळी केले.
   दरम्यान यावेळी उद्योजक कमलेश नारंग आणि सरिता नारंग यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनीय पुस्तके भेट दिली आहे.शाळेच्या शिक्षिका प्रा.पी.जी.चौधरी यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा लाभ मिळाला.यावेळी प्राचार्य के.पी.चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. एच.जी.बावा यांनी केले.सूत्रसन्नचालण प्रा.एम.डी.भुसारे यांनी केले.तर आभार प्रा.ए.के.वाबळे यांनी मानले.याप्रसंगी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने