महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सुरगाणा l प्रतिनिधी:- 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सततच्या पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकं पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, काही ठिकाणी भाताची रोपे कुजून गेली आहेत.
    तालुक्यातील अलंगुण, उंबरठाण,  ठाणगाव, बोरगाव, बाऱ्हे,निंबारपाडा, कचुरपाडा, गारेपाडा, चिंचला, हतगड या भागांमध्ये परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.
    शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, "या वर्षी चांगला पाऊस झाल्याने उत्पादनाची अपेक्षा होती, मात्र अखेरच्या टप्प्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे सर्व मेहनत वाया गेली."
    स्थानिक प्रशासनाने या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाकडे अहवाल सादर करण्याचे काम सुरू केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने