महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कवडासर येथे ८७ नागरिकांचे आभाकार्ड काढण्यात आले

दिंडोरी l प्रतिनिधी:- आज 28 ऑक्टोबर 2025 रोजी चाईल्ड सर्वायवल इंडिया,पर्नोड रिकार्ड इंडिया फाऊंडेशन, ग्रामपंचायत कवडासर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कवडासर येथे 87 ग्रामस्थांचे आभा व आयुष्यमान कार्ड काढण्यात आले.या अनुषंगाने गावातील लोकांना याविषयी जागृती करुन भविष्यात होणारे फायदे समजावून सांगण्यात आले.सदर कार्डचा उपयोग ग्रामस्थांना आरोग्याच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी होणार आहे. 
    यावेळी सरपंच ताराबाई राऊत, ग्रामसेवक कल्पना केदार, उपसरपंच मधुकर कराटे, मा.सरपंच कृष्णा राऊत ,विश्वनाथ चौधरी, आशा वर्कर रत्ना महाले, अंगणवाडी सेविका शांता पाडवी तसेच चाईल्ड सर्वायवल इंडिया संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र अहिरे,सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक वैभव खांडवी ,मेडिकल ऑफिसर अनुजा जाधव, फार्मसिस्ट पवन सोनवणे हेल्थ एज्युकेटर सोनाली शेळके, प्रवीण बैरागी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने