महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*निळवंडीच्या जय कानिफनाथ पाणी वापर संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत झाला सन्मान*

निळवंडी । मनोज पाटील:- पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंवर्धनासाठी हातभार लावणार्‍या निळवंडी ता. दिंडोरी येथील जय कानिफनाथ पाणी वापर सहकारी संस्थेला केंद्र सरकार आयोजित स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था’ म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते संस्थेला गौरविण्यात आले. संस्थेचे चेअरमन सुनील पाटील व सचिव सोमनाथ  पताडे व सहकार्‍यांनी पुरस्कार दिल्लीत स्वीकारला.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणार्‍या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रास प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. यावेळी खासदार भास्कर भगरे, दिंडोरी पंचायत समिती माजी उपसभापती कैलास पाटील, माजी उपसरपंच भाऊसाहेब पाटील, जय कानिफनाथ पाणी वापर संस्थेचे चेअरमन सुनील पाटील, व्हा. चेअरमन मधुकर पवार, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता वैभव भागवत, संचालक लक्ष्मीकांत वाघावकर, जैसल चौरासिया, ऋषिकेश भंडारी, दिंडोरीचे उपविभागीय अभियंता अभियंता वन्नेरे, कचरू पाटील, शाम पाटील, कचरू पवार, सुनील लोखंडे, विजय पवार, चंद्रकांत पाटील, माणिक पताडे, झुंबर पाटील, संस्थेचे सचिव सोमनाथ पताडे पुरस्कार स्वीकारताना उपस्थित होते. पालखेड विभागात वाघाडच्या माध्यमातून लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतरण झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. जय कानिफनाथ पाणी वापर संस्थेला पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे अन्न व प्रशासनमंत्री ना. नरहरी झिरवाळ, कादवा कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार रामदास चारोस्कर, वाघाड प्रकल्पाचे संंस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी, पोलिस पाटील अंबादास पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास पाटील, सरपंच मनिषा चारोस्कर, उपसरपंच शंकर पाटील, गणेश हिरे ,मनोज पाटील आदींसह तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.                                                                                    
यामुळे संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार
बंद नलिका वितरण प्रणाली, पम्पिंग स्टोरेज योजना प्रभावीपणे राबविणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा नियोजनपूर्ण वापर, पाण्याची योग्य साठवणूक, योग्य वितरण आणि पाण्याचे प्रदूषण कमी करणे असे कार्य निळवंडीच्या जय कानिफनाथ पाणी वापर संस्थेने केले. त्यामुळे ही संस्था पुरस्काराची धनी ठरली.                                                                                                                                                  *निळवंडी येथील कानिफनाथ पाणी वापर संस्थेला जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार दिंडोरी तालुक्यासाठी अभिमानास्पद असून याचे सर्व श्रेय संस्थेच्या संचालक मंडळासह  निळवंडी ग्रामस्थांचे आहे. 
                                 - भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी लोकसभा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने